मुंबई-गोवा महामार्गासाठी लागणार आणखी दोन वर्षे; खासदार सुरेश प्रभूंच्या पत्राचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले उत्तर

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या मार्गाचे काम दहा टप्प्यांत सुरू असून, डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे उत्तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. या महामार्गाच्या कामासंदर्भात खासदार सुरेश प्रभू यांनी गडकरींना पत्र लिहिले होते. 

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असल्याने वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. चौपदरीकरणाच्या नावाखाली जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सुरेश प्रभू यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांना विचारणा केली होती. दरम्यान, गडकरी यांनी प्रभूंना पत्र पाठवून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती सांगितली. तळेगाव ते कळमाठ हा टप्पा जवळपास पूर्णत्वास आला असून  कळमाठ ते झाराप मार्गावरील टप्प्याचे चौपदरीकरणाचे कामही पूर्ण झाल्याची माहिती गडकरी यांनी पत्रात दिली आहे. 

टप्पेनिहाय कामाची सद्यस्थिती 

  • पनवेल ते इंदापूर डिसेंबर 2021
  • कशेडी ते परशुराम घाट जून 2021  
  • वीर ते भोगवन खुर्द डिसेंबर 2021
  • वाकड ते तळेगाव मार्च 2021 
  • परशुराम घाट ते अरवली डिसेंबर 2021 
  • इंदापूर ते वडपाले मार्च 2022 पर्यंत 
  • भोगवन खुर्द ते कावठी मार्च 2022 
  • अरवली ते कांटे डिसेंबर 2022 
  • कांटे ते वाकड डिसेंबर 2022 

संबंधित बातम्या