
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग हा पुर्णत्वास विलंब होत असल्या कारणावरून चर्चेचा आणि चेष्टेचा विषय झाला आहे. दरम्यान, या महामार्गावर एका टँकरने धडकने दिल्याने एका साठ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावातील पुलावर हा अपघात झाला, अशी माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.या टँकरने 60 वर्षीय व्यक्तीच्या कारला टँकरने धडक दिली. काही अंतर कारला फरफटत नेले. यात कारचालक वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास नवी मुंबईतील मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावातील पुलावर घडली, अशी माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. श्रीकांत मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते रायगडमधील खालापूरमध्ये राहत होते.
श्रीकांत मोरे हे पत्नीसह कारने जात असताना मागून आलेल्या टँकरने त्यांच्या कारला धडक दिली. त्यामुळे काय झाले हे पाहण्यासाठी आणि टँकर चालकाला विचारण्यासाठी कार थांबवून मोरे गाडीतून खाली उतरले.
तथापि, टँकर चालकाशी वाद सुरू असतानाच टँकरने त्यांना धडक दिली. आणि काही अंतर फरफटत नेले. त्यात टँकरखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पळून गेला. मृत श्रीकांत मोरे यांच्या पत्नीने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.
मृताच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे, पनवेल तालुका पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, आरोपीची ओळख पटली असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, गणेशोत्सवापुर्वी या महामार्गावरील एक लेन खुली केली जाणार असल्याचे तसेच 42 किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.