Mumbai-Goa महामार्गावरील परशुराम घाट पुन्हा बंद; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Mumbai-Goa Latest News: परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरु आहे.
Mumbai Goa National Highway
Mumbai Goa National Highway Dainik Gomantak

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात (Parshuram Ghat) चौपदरीकरणाचे काम पुन्हा सुरु होणमार आहे. यासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसह माती भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक बंद करण्याचा विचार सुरु आहे. प्रशासन लवकरच याबाबत निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. परंतु परशुराम घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याला तेथिल ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. घाट पुन्हा बंद झाल्यास विद्यार्थी, शेतकरी तसेच नोकरदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

या वर्षाच्या उन्हाळ्यात (Summer) आणि त्यानंतरच्या पावसाळ्यात परशुराम घाट बंद करण्यात आल्याने मोठ्या समस्यांना समोरे जावे लागले होते. माथ्यावर असलेल्या नागरिकांची शेती खाली असल्याने आणि दैनंदिन व्यवहारही चिपळूणच्या बाजारपेठेशी असल्याने सहाजिकच घाट बंद कालावधीत त्यांना घरातच अडकून पडावे लागत होते. शिवाय शाळांनाही सुट्टी दिल्याने तसेच घाटाच्या वरील बाजूस लोटे एमआयडीसी (MIDC) असल्यामुळे चिपळूणमधून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनाही अडचणींना समोर जावे लागले होते. त्यामुळे यावेळी मात्र घाट बंद करण्यास परशुराम ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

Mumbai Goa National Highway
Jitendra Awhad Arrested: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक; पोलिस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
  • वर्षभरापासून परशुराम घाटातील काम सुरु

या महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणासाठी गेले वर्षभर काम सुरु आहे. यापूर्वी घाटात डोंगर कापताना अपघात घडल्याने घाटातील वाहतूक महिनाभर बंद ठेवून काम करण्यात आले होते.

चौपदरीकरणाच्या कामाच्या दृष्टीने 25 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 या कालावधीत हा घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती. त्यानंतर पावसाळ्यात (Rain) पोखरलेले डोंगर खचल्याने अतिवृष्टीत घाट महिनाभर बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे अवजड वाहतूक बंद ठेवून ती कळंबस्ते, आंबडस, चिरणीमार्गे लोटेकडे वळवण्यात आली होती.

  • पुन्हा घाट बंद करण्यास गावकऱ्यांचा विरोध

त्यातच आता घाटातील डोंगर कटाई आणि चौपदरीकरणासाठी भरावाचे काम पुन्हा सुरु केले जाणार आहे. डोंगर कापण्याचे काम सुरु असताना घाटातील वाहतुकीला फटका बसू नये, चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम वेगाने व्हावे, यासाठी घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवण्याचा प्रशासनाचा विचार सुरु आहे. परंतु घाट बंद केल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांचा, अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे घाट पुन्हा बंद करु नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com