वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालय़ाकडून अंतरिम जामीन मंजूर 

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

अर्बन नक्षलवाद आरोप प्रकरणात अटकेत असणारे लेखक- कवी वरवरा राव यांना मुंबई उच्चन्य़ायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे.

मुंबई: अर्बन नक्षलवादाच्या आरोप प्रकरणात अटकेत असणारे लेखक- कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्य़ायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. वैद्यकिय कारणांसाठी त्य़ांची अंतरिम जामीनावर सुटका करण्यात यावी अशी स्वतंत्र याचिका वरवरा राव यांच्या पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. प्रदिर्घ अशा सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका राखून ठेवली होती. त्यावर खंडपीठाने आज सुनावणी करताना 50 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना राव यांना त्यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी जाण्यास रोख लावला आहे.

वरवरा राव यांचे वय, आरोग्य, आणि वैद्यकिय सुवीधा मिळवण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता आम्ही त्यांना वैद्यकिय जामीन मंजूर केला आहे. असं न्यायलय़ाने अंतरिम जामीनावर निकाल देताना म्हटले आहे. सध्या त्यांना सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना एक तर शरणागती पत्करावी लागेल नाही तर मुदतवाढीसाठी जामीनचा अर्ज करावा लागेल. असे न्यायालयाने निकालामध्ये म्हटले आहे. तसेच वरवरा राव यांच्यावरील गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्यांना विशेष न्यायालयाच्य़ा परिसरातच रहावे लागणार आहे. त्य़ांना हैदराबादमधील निवासस्थानी जाता येणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा देऊळ बंद; प्रशासन अलर्ट

राव यांनी आपल्य़ा अटकेतील 365 दिवसांपैकी 149 दिवस रुग्णालयातच घालवले होते, यामधूनच त्यांची वैद्यकिय स्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते असा युक्तिवाद राव यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात केला होता. त्यामुळे त्यांची वैद्यकिय़ परिस्थिती माहीत असूनही त्यांना अटकेत ठेवणे हा त्यांच्य़ा जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे असा दावा कुटुंबींयानी न्य़ायालयात केला होता. राव यांची प्रकृती ही कोठडीत राहून नाही, तर कुटुंबात राहून सुधारेल असा दावा करत त्यांना तळोजा कारागृहाऐवजी हैदराबादमध्ये राहण्याची परावानगी देण्यात य़ावी अशी मागणी करणारा दावाही कुटुबांतर्फे करण्यात आला होता.

कोरोनामुळे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आठवडाभर पूर्ण लॉकडाउन

वरवरा राव यांच्यावर नक्षलवादी चळवळींना प्रोत्साहन देणे, सशस्त्र क्रांतीद्वारा सध्याचे सरकार उलथवून टाकण्यासारखे गंभीर आरोप आहेत. त्यांचे जे आजारपण आहे ते वृद्धत्वाशी संबंधीत असून त्यांना पुन्हा एखदा रुग्णालयात दाखल करता येईल. दरम्यान एनआयएकडून राव यांची प्रकृती स्थीर असून त्यांना रुग्णालयात ठेवण्य़ाची आवश्यकता नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र न्यायालयाने एनआयएची तुरुंगात ठेवण्य़ाची मागणी फेटाळली आहे. राव यांना प्रकृतीच्या कारणांमुळे जामीन मंजूर केला आहे, त्यांना आता नानावटी रुग्णालयामधून कारागृहात नंतर पाठवता येणार नाही. असं न्यायालय़ाने स्पष्ट केले आहे.    

संबंधित बातम्या