सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा अद्याप बंदच, मात्र लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

कोरोनामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वे बंद होण्याला दोन महिन्यांनी एक वर्ष पूर्ण होईल.

मुंबई :  कोरोनामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वे बंद होण्याला दोन महिन्यांनी एक वर्ष पूर्ण होईल. पण आता ही लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाल्याने सर्वसामान्यांकडून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल,मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

शरद पवारांनी मोदी सरकरला धरले धारेवर...

सध्या लोकल पूर्ण क्षमतेनिशी चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला नसून, सुरू असलेल्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. सोशल मिडियावर या निर्णयासंबंधी खोटी माहिती पसरवत 29 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी देखील लोकल सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, सत्य परिस्थिती बघता याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे सध्या तरी सरकारने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे इतर प्रवाशांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नाव न घेता राणेंनी लगावला माहाविकास आघाडीला टोला

तूर्तास मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून चालवण्यात येणाऱ्या 2781 लोकल सेवेत 29 जानेवारीपासून वाढ करून, 2985 लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. याबद्दलचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या