मास्क न घालणाऱ्यांकडून मुंबई पालिकेने दंड म्हणून वसूल केले तब्बल 'इतके' रुपये 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यानंतर देशात कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14,199 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि त्यामुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहचली आहे. सलग पाच दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याचे समोर येत आहे. या पाच दिवसात 13,506 कोरोनाचे सक्रिय रुग्ण वाढले आहेत. मागील आठवड्यात कोरोनाच्या वाढीचा वेग हा 1.5 टक्के होता. जो आता दुप्पट झाल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाची नवीन प्रकरणे फेब्रुवारीच्या 16 तारखेला 9121 म्हणजेच दहा हजारांवर आली होती. परंतु आता 22 फेब्रुवारी रोजी ही संख्या 14,199 वर पोहोचली आहे.

वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालय़ाकडून अंतरिम जामीन मंजूर 

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना संबंधित नियमांचे पूर्णपणे पालन करण्याचा इशारा केंद्र सरकारने या पाच राज्यांना दिला आहे. व यातील 74 टक्के सक्रिय प्रकरणे ही फक्त केरळ आणि महाराष्ट्रातील आहेत. महराष्ट्रात 22 फेब्रुवारी रोजी कोरोनाची  6971 नवी प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूला अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यावेळी फेस मास्क न लावणाऱ्यांवर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. राज्यात मुंबईतील प्रशासनाने फेस मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. 

गोव्यात कोरोना नियंत्रीत; महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा

मुंबईत काल 21 फेब्रुवारी रोजी फेस मास्क न घातलेल्या 14,100 जणांवर कारवाई केली आहे. आणि यावेळेस करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 28.20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. तसेच आतापर्यंत 16,02,536 जणांवर मास्क न घातल्याबद्दल कारवाई करण्यात आली असून, एकूण 32,41,14,800 रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे बीएमसीने आज सांगितले आहे.  

संबंधित बातम्या