अमेरिकेतून कुरियरने पाठवले अमली पदार्थ मुंबई NCBने केले जप्त

मुंबई कस्टम कंट्रोल झोन 3 ने कुरिअरद्वारे यूएसमधून तस्करी करण्यात येत असलेला 27.5 किलो अमलीपदार्थ जप्त केला.
अमेरिकेतून कुरियरने पाठवले अमली पदार्थ मुंबई NCBने केले जप्त
MumbaiDainik Gomantak

मुंबई कस्टम कंट्रोल झोन 3 ने कुरिअरद्वारे यूएसमधून (US) तस्करी करण्यात येत असलेला 27.5 किलो अमलीपदार्थ जप्त केला. तपासादरम्यान या प्रकरणातील सूत्रधाराची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली. सूत्रधाराच्या घराची झडती घेतली असता 20 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ आणि 120 हून अधिक हिरे चरस सापडलेले कस्टमच्या हाती लागला आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे असल्याचे सांगण्यात आले आहे. (Mumbai NCB seizes medicine sent by courier from US)

Mumbai
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या घरी सीबीआयची छापेमारी

अमेरिकेतुन मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि 27 किलो वजनाचे मारीजुआणा ड्रग्स घेऊन संबंधित आरोपी मुंबईत दाखल होत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीला अनुसरुन कस्टमकडून कारवाई केली गेली. या प्रकरणात मास्टरमाईड असणाऱ्या आरोपीला कस्टमकडून अटक झाली असून पुढील तपास सुरु आहे.

या घटनेतील आरोपीच्या घरात सर्च ऑपरेशन केल्यानंतरही 20 किलो मारीजुआणा ड्रग्स आणि काही प्रमाणात हशीश ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे मुंबईतील आमली पदार्थांसंदर्भाती गुन्हेगारी वाढत आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. या मोठ्या कारवाईनंतर कस्टम अधिकारी चांगलेच कामाला लागले असून पुढील तपासाचा चालना मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.