
परदेशातून आलेला प्रत्येक व्यक्ती मुंबईत आला की सर्वात आधी गेट वे ऑफ इंडिया पाहायला जातात. पण पुढचे काही दिवस गेटवे ऑफ इंडिया बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी सहा दिवसांपूर्वी संशयास्पद बोटीत शस्त्र सापडली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत गेटवे ऑफ इंडिया बंद राहणार आहे.
मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर सहा दिवसांपूर्वी माय लेडी हान नावाची संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीची तपासणी केली असता त्यात तीन AK-47 रायफल आणि अनेक राऊंड्स गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ही संशयास्पद सापडल्यानंतर आता मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेट वे ऑफ इंडिया इथून सुटणाऱ्या बोटीचं तिकीट ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच आत सोडलं जात आहे. इतर कोणालाही तिथे जाण्याची परवानगी दिली नाही.
दरम्यान हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोट प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने आर्म्स अॅक्ट अंतर्गत अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र एटीएस या प्रकरणी संबंधित कंपनीशी बातचीत करुन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर मागील आठवड्यात गुरुवारी (18 ऑगस्ट) सकाळी 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती. ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.
या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) तोंडावर बोटीवर शस्त्रं सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.