मुंबईतील रुग्णसंख्या 25 हजारांवर

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

- 1,382 बाधितांची भर
- आणखी 41 जणांचा मृत्यू
- मृतांचा आकडा 882 वर

मुंबई

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच असून नव्या एक हजार 382 रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा 25 हजार 317 वर पोहोचला. मृतांची संख्या 41 ने वाढल्यामुळे कोव्हिडबळींचा आकडा 882 वर गेला. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी 142 जण गेल्या आठवडाभरातील आहेत.
मुंबईतील वेगवेगळ्या भागांत कोव्हिड- 19 विषाणूचा संसर्ग झालेले एक हजार 382 नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 25 हजार 317 झाली. त्यापैकी एक हजार 240 रुग्णांची गुरुवारी नोंद झाली, तर 142 रुग्ण आठवडाभरापूर्वी दाखल झाले आहेत. दगावलेल्या 41 रुग्णांपैकी 23 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 24 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी तिघे 40 वर्षांखालील, 21 जण 60 वर्षांवरील आणि 17 जण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. मुंबईतील कोरोनाबळींचा आकडा 841 झाला आहे.

आतापर्यंत 6,751 रुग्ण कोरोनामुक्त
गुरुवारी 777 नवे संशयित रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 22 हजार 484 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आणखी 285 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 6 हजार 751 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. महापालिका रुग्णालयांतील पाच हजार 524 रुग्ण आणि खासगी रुग्णालयांतील एक हजार 227 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयांत दाखल झालेल्या 28 टक्के रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, त्यांच्यापैकी 46 टक्के महिला आणि 54 टक्के पुरुष आहेत.

संबंधित बातम्या