अमली पदार्थ विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 16 कोटींचा मुद्देमाल जप्त

अमली पदार्थ प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
अमली पदार्थ विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 16 कोटींचा मुद्देमाल जप्त
Maharashtra Dainik Gomantak

अमली पदार्थ प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने 3 अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. यावेळी पथकाला 16 किलो 100 ग्रॅम अमली पदार्थ मिळाले. बाजारात या अमली पदार्थांची किंमत सुमारे 16 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या ताब्यातील पिशव्यांची झडती घेतली असता, टीमला 16.100 किलो मेथाक्वॉलोन सापडले, ज्याची किंमत सुमारे 16.10 कोटी रुपये आहे. (Maharashtra News Update)

अनटॉप हिल परिसरात 3 जण अमली पदार्थांची विक्री करणार असल्याची माहिती मुंबई (Mumbai) पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दारू तस्करांना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही टोळी चालवण्यामागे मोठा हात असण्याची शक्यता पोलिसांना आहे.

Maharashtra
CM-PM ऑनलाईन बैठकीत CM उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई क्राइम ब्रँच आणि इतर संघटनांकडून ड्रग्जविरोधात मोहीम सुरू आहे. त्याचा वापर, व्यवहार आणि विक्रेत्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. अलीकडेच, गुन्हे शाखा आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा अनेक लोकांना अटक केली.

या तिघांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com