Mumbai Raid: NCB ची कारवाई 'फर्जी', नवाब मालिकांचा आरोप

त्या तिघांना कुणाच्या आदेशावरून सोडलं गेलं याचा खुलासा NCB ने करावं असे सांगत नवाब मालिकांनी ही पूर्ण कारवाई खोटी असल्याचं सांगितलं आहे.
Mumbai Raid: NCB ची कारवाई 'फर्जी', नवाब मालिकांचा आरोप
Mumbai Raid: NCB raid is totally fake Nawab Malik claimDainik Gomantak

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी NCB ने अकरा जणांना अटक केली होती असे सांगत अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. अमीर फर्निचरवाला, रिषभ सचदेवा आणि प्रतीक गाभा या तीन आरोपींना का सोडल असा प्रश्न उपस्थित केला आहे. या तीन आरोपींपैकी रिषभ सचदेवा हा भाजप नेते यांचा मेव्हणा आहे. आता या तिघांना कुणाच्या आदेशावरून सोडलं गेलं याचा खुलासा NCB ने करावं असे सांगत नवाब मालिकांनी ही पूर्ण कारवाई खोटी असल्याचं सांगितलं आहे.त्याचबरोबर सेलिब्रिटांना गोवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला होता असा आरोप देखील त्यांनी केला आहे.(Mumbai Raid: NCB raid is totally fake Nawab Malik claim)

नवाब मलिक यांनी क्रूझवरील छापे बनावट असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण छापा बनावट असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कॉल डिटेल्सचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आर्यन खानसोबत काहीही सापडले नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना केला आहे . प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला त्याला अडकवण्यासाठी तिथे घेऊन गेले. या दोघांनाही सोडण्यात आले.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी रिषभ सचदेवा यांची कांबोज आणि कुटुंबासह चित्रे दाखवली आणि सांगितले की, 1300 लोक असलेल्या क्रूझमधून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आमच्याकडे अशी माहिती आहे की दिल्लीत बसलेले स्थानिक भाजप नेते आणि नेत्यांनी सचदेवा, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या सुटकेसाठी फोन केले. समीर वानखेडे यांना का सोडण्यात आले याचे उत्तर द्यावे लागेल. त्यांना सोडण्यापूर्वी त्यांना काय प्रश्न विचारण्यात आले? असा सवाल त्यांनी NCB ला केला आहे.

Related Stories

No stories found.