POCSO
POCSODainik Gomantak

मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्याला विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

मुंबईतील विशेष पॉक्सो न्यायालयाने गुरुवारी एका 23 वर्षीय तरुणाला त्याच्या शेजारच्या 15 वर्षीय मुलावर अनेक वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले.

मुंबईतील विशेष पॉक्सो न्यायालयाने गुरुवारी एका 23 वर्षीय तरुणाला त्याच्या शेजारच्या 15 वर्षीय मुलावर अनेक वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. त्यानंतर त्याला 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा मुलगा अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) या आजाराने ग्रस्त असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाची जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे (DLSA) नुकसान भरपाईसाठी शिफारस करण्यात आली होती. जिथे आरोपींना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

POCSO
'गांजाच्या रोपाला फळ-फुल नसेल तर ते भांग नसणार' - मुंबई HC

असा झाला प्रकरणाचा खुलासा

विशेष सरकारी वकील वीणा शेलार यांनी पीडित मुलासह साक्षीदारांची विचारपुस केली. मुलाने सांगितले की, 2019 मध्ये, जेव्हा तो 12 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या शेजाऱ्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे त्याने आईच्या पैशाच्या पेटीतून 100 रुपये घेतले. मात्र, तो पकडला गेला. बरीच चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की शेजारी त्याच्याकडे पैशाची मागणी करत आहे, कारण त्याला त्याचे गुपित माहित होते. मुलाने आपल्या आईला सांगितले की, आरोपी त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत असे आणि त्याला ओरल सेक्स करण्यास भाग पाडत असे. तो साधारण 5-6 वर्षांचा असताना याची सुरुवात झाल्याचे मुलाने सांगितले.

POCSO
'खरी Shiv Sena कोणाची' यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात होऊ शकते सुनावणी

धमकी देवून करायचा चूकीचे काम

हा प्रकार कोणाला सांगितल्यास आईची बदनामी होईल आणि ती त्याला घरातून हाकलून देईल, असे आरोपी त्याला घाबरवत असे, जेव्हा मुलाची आई कामात व्यस्त असते तेव्हा आरोपी त्याच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, अशी माहिती मुलाने दिली. यावेळी घरात असलेल्या बहिलणीला बाहेर खेळण्यासाठी पाठवण्यास सांगायचा. तसे न केल्यास सर्व काही सांगेन, अशी धमकी तो मुलाला देत असे. हा सर्व प्रकार जेव्हा सहनशीलतेच्या पलिकडे गेला तेव्हा मुलाने आपल्या पालकांसह पोलिस स्टेशन गाठले. आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com