होणाऱ्या बायकोला 'तसा' मेसेज पाठवणे गुन्हा नाही, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय

लग्नाआधी होणाऱ्या बायकोला अश्‍लील मेसेज पाठवणे हा गुन्हा नाही आणि त्यामुळे कोणाच्याही प्रतिष्ठेचा अपमान होत नाही.
Mumbai's sessions court verdict, sending obscene messages to fiancee is not a crime
Mumbai's sessions court verdict, sending obscene messages to fiancee is not a crimeDainik Gomantak

लग्नाआधी होणाऱ्या बायकोला अश्‍लील मेसेज पाठवणे हा गुन्हा नाही आणि त्यामुळे कोणाच्याही प्रतिष्ठेचा अपमान होत नाही. असे म्हणत मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार प्रकरणातून एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. लग्नाआधी होणाऱ्या बायकोला अश्लील मेसेज पाठवणे हा कोणाच्याही प्रतिष्ठेचा अपमान नाही, असे म्हणत न्यायालयाने त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. तसेच असे संदेश एकमेकांच्या भावना समजून घेणारे असू शकतात, असेही सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय तरुणावर 11 वर्षांपूर्वी त्याच्या होणाऱ्या बायकोने लग्नाच्या बहाण्याने बलात्काराचा आरोप केला होता. याच प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, जर एखाद्याला दुसरा व्यक्ती आवडत नसेल, तर त्याचे दुःख समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे हा त्याचा अधिकार आहे आणि दुसऱ्या पक्षाने अशी चूक टाळली पाहिजे. न्यायालयाने म्हटले की या संदेशांचा उद्देश होणाऱ्या बायको समोर आपल्या इच्छा व्यक्त करणे, लैंगिक भावना जागृत करणे इत्यादी असू शकते, हे संदेश होणाऱ्या बायकोला आनंदी देखील करू शकतात. पण अशा एसएमएसमुळे लग्न होणार्‍या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे म्हणता येणार नाही.

Mumbai's sessions court verdict, sending obscene messages to fiancee is not a crime
यह क्या किया तूने समीर दाऊद वानखेड़े? नवाब मालकांनी पुन्हा घेरले

महिलेने 2010 मध्ये त्या पुरुषाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. 2007 मध्ये एका मॅट्रिमोनिअल साइटवर दोघांची भेट झाली होती. मात्र तरुणाच्या आईचा या लग्नाला विरोध होता, त्यामुळे तरुणाने २०१० मध्ये तरुणीशी संबंध तोडले. त्यावर कोर्टाने म्हटले की, लग्नाचे आश्वासन मागे घेणे याला फसवणूक किंवा बलात्कार म्हणता येणार नाही.

न्यायालयाने पुढे सांगितले की, तरुण मंगळसूत्र घेऊन आर्य समाज मंदिरात गेला होता. मात्र या नात्याला आईची मान्यता मिळत नसल्याचे पाहून त्याने मुलीसोबतचे सर्व संबंध संपवले. तरुणाने आपल्या आईच्या इच्छेचे पालन केले आणि समस्येचा सामना करण्याऐवजी ते टाळण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या खोट्या आश्वासनांची ही केस नाही. प्रयत्न योग्य पद्धतीने न केल्याचे हे प्रकरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com