सहा तासांत खुनाचे आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

दोघा आरोपीने आपल्या आईला आणि प्रेयसीला मारहाण केल्याचा रागातून हत्या केल्याची कबुलीही पोलिसांना दिली.

अंधेरी

आर्थिक देवाणघेवाणीतून उद्भवलेल्या भांडणामुळे प्रेयसीसह आईला मारहाण केल्याच्या रागात 31 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. दिंडोशी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत हत्या करणाऱ्या दोघा आरोपीने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी बोरिवलीच्या स्थानिक न्यायालयात नेले असता त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली. दोघा आरोपीने आपल्या आईला आणि प्रेयसीला मारहाण केल्याचा रागातून हत्या केल्याची कबुलीही पोलिसांना दिली. अटक आरोपी कल्पेश अशोक कळब आणि शहनवाज इंतजार खान ऊर्फ सानू यांचा समावेश असून यातील मुख्य आरोपी कल्पेश याने हत्येची कबुली दिलेली आहे. गोरेगाव ओबेरोय मोलजवळील फूटपाथवर एक तरुण पडलेल्या अवस्थेत आढळला. याबाबतची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळताच त्यांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर तरुणाला मृत घोषित केले; मात्र तरुणांची ओळख अद्याप पटलेली नव्हती, दिंडोशी पोलिस हे ओळख पाठविण्याचा प्रयत्न करीत असतानाच मृतक 31 वर्षीय हा बंजारीपाडा, हनुमान सोसायटीमध्ये राहत असलायचा माहिती मिळाली. चौकशीअंती त्याचे नाव अरुण प्रभुनाथ शर्मा असल्याचे समोर आले. त्याचे वडील प्रभुनाथ शर्मा यांच्या तक्रारीनुसार दिंडोशी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर अवघ्या सहा तासांत आरोपीला बेड्या ठोकण्यात यश मिळवले.

संबंधित बातम्या