पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी ठाकरे सरकारची केंद्राकडे 3 हजार कोटींची मागणी

महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान 3 हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा अशी मागणी खासदारांकडून करण्यात अली आहे. (Maharashtra Floods)
पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी ठाकरे सरकारची केंद्राकडे 3 हजार कोटींची मागणी
MVA government demands Rs 3000 crore from Centre for flood reliefDainik Gomantak

राज्यात पावसाने घातलेले थैमान(Maharashtra Rains) आणि कोकण(Konkan) पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरांमुळे(Maharashtra Floods) मोठ्या प्रमाणात राज्यात वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे. या अवस्थेतून राज्याला सावरण्यासाठी मोठ्या निधीची गरज लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आधीच पूरग्रस्त भागाचा दौरा करून मदतीचे आश्वासन दिले आहे मात्र आता केंद्रानेही या संकटातून सावरण्यासाठी राज्याला मदत द्यावी अशी मागणी राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्वे खासदारांनी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. (MVA government demands Rs 3000 crore from Centre for flood relief)

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान 3 हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा अशी मागणी खासदारांकडून करण्यात अली आहे.

MVA government demands Rs 3000 crore from Centre for flood relief
Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता ,सरकारचा व्यापाऱ्यांना दिलासा

यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासह खा. विनायक राऊत, माजी मंत्री अरविंद सावंत, प्रियंका चर्तुेवेदी, कृपाल तुमाने, फौजिया खान, सुनील तटकरे आदींनी सीतारामन यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. असून याअगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना याबाबात पत्र पाठवले आहे.

या पुरात अनेक लोकांचे कागदपत्र वाहून गेले आहेत आणि अशात विमा कंपन्याही मदतीस टाळाटाळ करताना पाहायला मिळत आहेत, अशात केंद्राने पूरग्रस्तांसाठी विम्यासंबंधीचे नियम बदलावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय पथक पाठवून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घ्यावा तसेच राज्याला एनडीआरएफचा अतिरिक्त निधी मिळावा यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्र वेळ मागण्यात आली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com