'शरद पवारांमुळेच माझे राजकीय पुनर्वसन'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे रविवारी दुपारी त्यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर दाखल झाले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मुक्‍ताईनगर (जि. जळगाव)-  भाजपमध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे, परंतु पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला.

फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपमध्ये राहिलो असतो तर मी राजकीय वीजनवासात गेलो असतो. अडवानी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते, म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले असून मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना रविवारी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे रविवारी दुपारी त्यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर दाखल झाले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 

चार वर्षे अन्याय

खडसे म्हणाले, की दसरा हा आनंदाचा सण आहे. या शुभ मुहूर्तावर आपण भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालो. भाजपमध्ये आपल्याला अपमानाची वागणूक मिळाली तेव्हा कार्यकर्ते चिडायचे, संताप व्यक्त करायचे. गेली चार वर्षे मी हा अन्याय सहन केला. माझे मंत्रिपद का काढले? हे अनुत्तरित आहे. 
 

संबंधित बातम्या