छोटू भोयर यांनी कमळ सोडून धरला काँग्रेसचा हात

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याचा किती फटका बसतो, आणखी काही असंतुष्ट कॉंग्रेस च्या गळाला लागतील का, हे पहाणं महत्त्वाचं
छोटू भोयर यांनी कमळ सोडून धरला काँग्रेसचा हात
भाजप आणि काँग्रेस Dainik Gomantak

नागपूर: ऐन विधानपरिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूरात पक्षाला मोठा धक्का बसला आहे . कारण भाजपचे कट्टर स्वयंसेवक छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. छोटू भोयर यांना कॉंग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी देऊन भाजप समोर मोठे आव्हान उभे केले आहे. छोटू भोयर त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने काँग्रेसला याचा फायदा मोठा होणार आहे.

काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्या नंतर छोटू भोयर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'भाजप पक्षात वारंवार अपमान झाला, पक्षात बाहेरून आलेल्यांना संधी दिली जातो, त्यामुळे आपण काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करत आहे.

भाजप आणि काँग्रेस
परमबीर सिंग यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

काँग्रेसने भोयर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार बावनकुळे यांच्या विरोधात काँग्रेसने संघ विचाराच्या भोयर यांना उमेदवारी देत भाजप समोर आव्हान उभं केलं आहे. मात्र, विजय आपलाच होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com