नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

सध्या कोरोनाची लागण झाल्यामुळे सध्या गृह विलगीकरणात असलेले नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची  मुंबईला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली. 

नागपूर: सध्या कोरोनाची लागण झाल्यामुळे सध्या गृह विलगीकरणात असलेले नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची  मुंबईला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली.  त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जागी सुमारे महिनाभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले राधाकृष्णन यांना नागपूरमध्ये पाठवण्यात आले आहे.

मुंढे यांना त्वरित रुजू होण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे तेरा वर्षाच्या कार्यकाळात मुंढे यांची ही बारावी बदली आहे. नागपूरमध्ये ते अवघे सात महिने होते. मुंढे नागपूरला आले तेव्हा त्यांनी महापौरांची भेटही घेणे टाळले होते. नागपुरात येताच त्यांनी बदल्या आणि निलंबनाचा धडाका लावला. त्यामुळे त्यांचा सत्ताधारी भाजपशी पंगा सुरू झाला. 

संबंधित बातम्या