नाना पटोले यांनी दिला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षदाचा राजीनामा 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाल्यानंतर नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोधी निवड झाली होती. परंतु त्यांनी आज विधान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाल्यानंतर नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोधी निवड झाली होती. परंतु त्यांनी आज विधान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्यातील तीनही पक्ष एकत्र येवुन नविन विधानसभा अध्यक्ष ठरवु असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचक विधान केले आहे. 

नाना पटोले यांनी आज अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जनतेला न्याय मिळावा म्हणुन राजीनामा दिला असल्याचे सांगितले. मला संघटनात्मक काम करायला आवडते. मला पक्षाने विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्या असा आदेश दिला होता आणि त्यानुसारच आपण आदेशाचे पालन केले असल्याचे  नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

म्हापसा नगरपालिकेच्या निवडणुकांबाबत भाजपा विरोधातील सर्वच गटांनी व उमेदवारांनी...

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नविन अध्यक्ष कोण होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. जेव्हा महाविकास आघाडी निर्माण झाली होती तेव्हा मुख्यमंत्री पद शिवसेनेला, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीला आणि विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेसला देण्यात येणार असल्याचे ठरले होते.  

यादरम्यान, नाना पटोलेंना राज्याचे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मिळणार अशा चर्चांना उधाण आले असून, आता काँग्रेस पक्षबांधणीची धुरा नाना पटोलें कडे येणार असल्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर महाविकास आघाडी मधील पक्षांनी आपापल्या पक्षाची बांधणी करायला सुरुवात केली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील हे आज विदर्भामध्ये पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना भेटायला गेले आहेत.

संबंधित बातम्या