ट्विट प्रकरण : शूटिंग बंद पाडू; अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना काँग्रेसचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाची शूटिंग राज्यात होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. 

मुंबईः महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाची शूटिंग राज्यात होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार  सतत टीका करत होते. मात्र नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये महागाई इतकी वाढली आहे आणि पेट्रोल-डिझेल-एलपीजीच्या किंमती गगनाला भिडत आहेत, तेव्हा आता या दोघांची बडबड का बंद झाली आहे. मोदी सरकारच्या काळात ते शांत असल्याची टीका पटोलेंनी या दोन अभिनेत्यांवर केली आहे. ते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

"सर्वसामान्यांचे जगणे “डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढीमुळे कठीण झाले आहे. मनमोहन सिंग यांचे सरकार होते त्यावेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरवरून टिवटिव करायचे आणि टीका करायचे. आज ते शांत का आहेत?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यांमध्ये पुन्हा होणार लॉकडाऊन? -

कॉंग्रेस नेते पाटोले यांच्या या धमकीवर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम कदम यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "भरदिवसा कॉंग्रेस नेत्यांकडून देशातील प्रतिभावान आणि प्रतिष्ठित कलाकार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना धमकावले जात आहे.  म्हणत आहे की ते त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण करू देणार नाही, त्यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, राष्ट्रीय हिताचे ट्विट करणे गुन्हा कसा काय ठरू शकतो?' असे राम कदम यांनी म्हटले आहे. "परदेशी बसलेले लोक षडयंत्र रचून देशाची बदनामी करीत आहेत, कॉंग्रेस पक्ष त्यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. कॉंग्रेसने मर्यादा ओलांडल्या आहेत. हे भारतमातेसोबत असलेल्या कलाकारांना थांबवत आहे. कॉंग्रेस नेत्यांनो ऐका, जो कोणी व्यक्ती किंवा कलाकार देशाच्या पाठीशी उभा आहे, त्याच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे," असे  वक्तव्य भाजप प्रवक्त्यांनी केले आहे.

 

संबंधित बातम्या