"राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं ?"..नारायण राणेंचा घणाघात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 7 जानेवारी 2021

गेल्या साठ वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही,  ते सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मादींनी करुन दाखवलं असा घणाघात भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.  

सिंधुदुर्ग :  केंद्र सरकारच्या कृषी कायदा समर्थनात भाजपतर्फे सिंधुदुर्गात आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.  त्यावेळी राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं ? असे बोचरे प्रश्न विचारत गेल्या साठ वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही,  ते सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मादींनी करुन दाखवलं असा घणाघात भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.  

ठाकरे आणि कोकणचं आधीपासूनच वाकडं आहे. मुख्यमंत्री मातोश्रीत बसून सरकार चालवत आहेत. शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे, यांनी शेतीतलं काही कळत नाही, त्यामुळे शेतकऱअयाचं हित असलेल्या कृषी कायद्यांना विरोध करत असल्याचं नारायण राणे म्हणाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे समर्थक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.

संबंधित बातम्या