'मी अजित पवारांना ओळखत नाही', नारायण राणेंनी पवारांवर साधला निशाणा

जिल्हा बॅंकेतील पापं लपविण्यासाठी राज्यात सत्तेचा गैरवापर केला जात आहे.
'मी अजित पवारांना ओळखत नाही', नारायण राणेंनी पवारांवर साधला निशाणा

Narayan Rane

Dainik Gomantak 

महाराष्ट्रातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन राजकीय नेत्यांच्या भाषणांनी गाजत आहे. विरोधी पक्षांतील नेते आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. तर आता भाजपचे केंद्रीय नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनीही माध्यमाशी बोलताना सरकारवर हल्ला चढवला.

ते म्हणाले, ''जिल्हा बॅंकेतील पापं लपविण्यासाठी राज्यात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्याचबरोबर एवढा मोठा फौजफाठा कणकवलीमध्ये कशासाठी? या राज्याला मुख्यमंत्री आहेत की नाहीत हे मला माहिती नाही. विधीमंडळात सगळ्या आमदारांपेक्षा नितेश राणे (nitesh rane) सर्वात जास्त काम करत आहे.''

<div class="paragraphs"><p>Narayan Rane</p></div>
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात येणार का? संजय राऊत म्हणाले 'वेट अँड वॉच'...

दरम्यान, 'ते पुढे म्हणाले, मी अजित पवारांना ओळखत नाही. संतोष परब हल्ल्याप्रकरणात नितेश राणेंना गोवले जात आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे.'

नितेश राणे कुठे आहेत, यावर राणे म्हणाले, ते कुठे आहेत हे मला माहिती असले तरी मी तुम्हाला का सांगू?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.