नाव न घेता राणेंची सेनेच्या नेत्यांवर कोकणी तोफ
Narayan RaneDainik Gomantak

नाव न घेता राणेंची सेनेच्या नेत्यांवर कोकणी तोफ

चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावेळी एकत्र आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकत्र आले. दरम्यान राणे आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. यातच आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाचा महामेरु कोणत्या दिशेने लवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान राणे म्हणाले, ''सिंधुदुर्गासाठी अत्यावश्यक असणाऱ्या विमानतळाच्या उद्घटनासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आले त्यांचे मी आभार मानतो. विमानतळ पाहिलं आणि मला आनंद खूप आनंद झाला. आम्ही मंचकाकडे येत होतो तेव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मला भेटले आणि माझ्याशी काहीतरी बोलले. पण ते जाऊद्या. मी 1990 मध्ये या जिल्ह्यात आलो होतो, मात्र माझं कार्यक्षेत्र मुंबई होते. मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला या जिल्ह्यामध्ये पाठवले. त्यावेळी या जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा नव्हत्या. जिल्ह्यातील तरुण रोजगाराच्या शोधात मुबंईच्या दिशेने जात होते. लोक सांगतील या जिल्ह्याचा विकास झाला कोणी केला आहे,'' असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

Narayan Rane
देशात पुन्हा भाजपचेच सरकार येणार: नारायण राणे

तसेच, 'उध्दवजी मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. सिंधुदुर्ग पर्यटनासाठी पोषक जिल्हा आहे. 1995 मध्ये ज्यावेळी युतीचे सरकार आले तेव्हा आम्ही सिंधुदुर्गला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले. या जिल्ह्याचा जो विकास झाला त्यासाठी माझंही श्रेय महत्त्वाचे आहे. आणि ते लोकांना चांगलचं माहीत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्यावेळी रोखण्यात आले होते. मात्र परिस्थिती बदलते यावर माझा चांगलाच विश्वास होता. माझ्या काळात जेवढा विकास झाला तेवढा अजूनही झालेला नाही. मुंबई- गोवा महामार्गाच्या विकासामध्ये कंत्राटदारांना कोण आडवतं ते मला चांगलंच माहित आहे,' म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर हल्ला चढवला.

Narayan Rane
नारायण राणे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

शिवाय, ''आता विमानतळावर उतरल्यावर लोकांनी जनतेने काही खड्डे पाहावेत का? मात्र सध्या आंदोलन करणारे लोक आता मंचकावर आहेत हे दुर्देवी आहे. भर कार्यक्रमात नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आवाहन केले. तसेच कोकणाचा विकास करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मी इथल्या देवदेवतांना या लोकांची इडापिडा टळो यासाठी देवाला प्रार्थना यावेळी कामना करतो. विनायक राऊतांनी पेढ्याचं गुणधर्म आत्मसात करावा असा टोमणाही यावेळी नारायण राणे यांनी लगावला. इथेच थांबून मी मंचकावर उपस्थितांचे आभार मानतो,'' असं म्हणत नारायण राणे यांनी आपले भाषण थांबवले.

Related Stories

No stories found.