NCB: समीर वानखेडेंचा कार्यकाळ पूर्ण, 300 हून अधिक अटकेसह असा झाला प्रवास

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यांनी एनसीबीमध्ये मुदतवाढ मागितलेली नाही.
NCB: समीर वानखेडेंचा कार्यकाळ पूर्ण, 300 हून अधिक अटकेसह असा झाला प्रवास

Sameer Wankhede

Dainik Gomantak

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यांनी एनसीबीमध्ये मुदतवाढ मागितलेली नाही. एनसीबीने ही माहिती दिली. वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केल्याने ते चर्चेत आले होते. या प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यनला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे, 2008 बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी, हे निवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी दयानदेव वानखेडे यांचे पुत्र आहेत.

दरम्यान, मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपत असून, ते मुदतवाढ मागणार नाहीत, असे निवेदन एनसीबीने (NCB) जारी केले होते. ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत त्यांनी 96 लोकांना अटक केली आणि 28 गुन्हे दाखल केले. 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक केली आणि 117 गुन्हे दाखल केले. एनसीबीने पुढे माहिती दिली की, समीर वानखेडे यांनी आपल्या एनसीबीतील कार्यकाळादरम्यान सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलो पेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता गोठवली होती.

<div class="paragraphs"><p>Sameer Wankhede</p></div>
समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी राज्यपालांची घेतली भेट !

सुशांत सिंग प्रकरणी 'होम मिनिस्टर मेडल' ने गौरव

समीर वानखेडे यांनी NCB मध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त एसपी म्हणून काम केले होते. नंतर त्यांची कस्टम्सचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांची मुंबई विमानतळावर नियुक्ती करण्यात आली. मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटसोबत काम करताना त्यांनी सीमाशुल्क चुकवणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना पकडले.

ऑगस्ट 2020 मध्ये, सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते एनसीबीमध्ये आले होते. हे प्रकरण स्वत:च्या हातात घेऊन त्यांनी 33 हून अधिक जणांना अटक केली. 2021 मध्ये उत्कृष्ट कामासाठी त्यांना 'होम मिनिस्टर्स मेडल' प्रदान करण्यात आले. अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून सुरुवात करुन, सप्टेंबर 2020 पासून एनसीबीने वानखेडे अंतर्गत अनेक हाय-प्रोफाइल बॉलीवूड (bollywood) सेलिब्रिटींची चौकशी करुन त्यांना अटक केली. केंद्रीय एजन्सीमध्ये प्रतिनियुक्तीवर ते होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com