Narendra Modi Threatened: PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Threat To PM Modi: पीएम मोदींना धमक्या मिळाल्यानंतर मुंबईच्या वरळी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

Narendra Modi Threat Call: मुंबई वाहतूक पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना पीएम मोदींबाबत धमकीचा फोन आला होता, त्यानंतर खळबळ उडाली. कॉलशिवाय मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेजही आला. पीएम मोदींबाबत धमकीचा फोन आल्यानंतर मुंबईच्या वरळी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याशिवाय सायबर टीमलाही अलर्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, हा कॉल जिथून आला होता त्याचा मोबाईल नंबर आणि यूजर आयडी पोलिसांनी (Police) ट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस दल अलर्ट मोडवर असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. जो कोणी दोषी असेल त्याला लवकरच पकडले जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

PM Narendra Modi
Narendra Modi Stadium चे नाव बदलणार काँग्रेस, जाहीरनाम्यात दिले मोठे आश्वासन

दुसरीकडे, मुंबई (Mumbai) वाहतूक पोलिसांना आलेला हा धमकीचा कॉल 'डी कंपनी'चा असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्याकडे ऑडिओ क्लिपही मिळाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे, मुंबई वाहतूक पोलिसांना पीएम मोदींबाबत धमकी मिळताच त्याची माहिती मुंबईतील वरळी पोलीस स्टेशनला देण्यात आली. यानंतर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. याप्रकरणी सायबर सेलचीही मदत घेण्यात आली आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi: भारताला पोलाद निर्मितीचे हब बनविणार; गुजरातमध्ये 60 हजार कोटींच्या प्रकल्पाचे भूमीपुजन

वृत्तानुसार, पीएम मोदींबाबत वाहतूक पोलिसांना धमकी मिळाल्यानंतर मुंबई क्राइम ब्रँचला अलर्ट करण्यात आले आहे. यामागे कोण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com