25 जानेवारीपासून नाशिक ते बेळगाव प्रवास करा विमानाने

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

25 जानेवारीपासून मात्र संजय घोडावत समूहाच्या बेंगळुरुस्थित स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विनाथांबा विमानसेवा सुरु होत असून एक तासात नाशिकहून बेळगावमध्ये पोहोचता येईल.

नाशिक :  नाशिक ते बेळगाव हे अंतर 580 किलोमीटर असून हा प्रवास 12 तासांचा आहे. 25 जानेवारीपासून मात्र संजय घोडावत समूहाच्या बेंगळुरुस्थित स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विनाथांबा विमानसेवा सुरु होत असून एक तासात नाशिकहून बेळगावमध्ये पोहोचता येईल.

कोविशील्डचे उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूटला आग

सोमवार, शुक्रवार, रविवारी विमानाचे सायंकाळी 4:40 मिनिटांनी बेळगावमधून, तर नाशिकच्या ओझर विमानतळावरुन सायंकाळी 6:12 वाजता उड्डाण होईल.  

गोव्यासह या आठ जिल्ह्यातील तरूणांसाठी खूशखबर... 5 ते 25 मार्चदरम्यान होणार सैन्यभरती 

स्टार एअर कंपनीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त ‘उडाण' योजनेतंर्गत विमानसेवा सुरु होत असल्याने 24 जानेवारीपर्यंत 1 हजार 202 रुपयांच्या भाड्याची सवलत देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी ते 24 ऑगस्टपर्यंत नाशिक ते बेळगाव विमानाचे भाडे 1 हजार 999 रुपये असणार आहे. 

संबंधित बातम्या