Goa Election: गोवा बीचवर ‘आव गोयंचो सायबा’

गोव्यात (Goa) गेलो तरी ‘मी पुन्हा येईन’ म्हणत राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला
Goa Election: गोवा बीचवर ‘आव गोयंचो सायबा’
Devendra Fadnavis CartoonsDanik Gomantak

मुंबई : गोव्याच्या (Goa) बीचवर (Beach) पर्यटकाची (Tourist) वेशभूषा करून ‘मी पुन्हा येईन’ असा महाराष्ट्राला (Maharashtra) दिलेला गर्भित इशाऱ्याचा फलक घेऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एका व्यंगचित्रात उभे आहेत. गोव्यात ‘फक्त पर्यटन’ करुन परत येणार अशा आशयाचे एक व्यंगचित्र काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीस यांची ‘सुप्त इच्छा’ समोर आणली आहे.

भाजपने आगामी गोवा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. मात्र गोव्यापेक्षा महाराष्ट्रात भाजप ची सत्ता आली तर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची फडणवीस यांची सुप्त इच्छा या व्यंगचित्रातून बाहेर आली आहे. त्यामुळे गोव्यातही फडणवीस भाजपची सत्ता आणतील का याबाबत क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्रातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Devendra Fadnavis Cartoons
Goa Election: मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर

क्लाईड क्रास्टो हे आपल्या व्यंगचित्रातून नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आणि भाजपवर फटकारे मारत असतात. आणि आता फडणवीस यांची गोवा भाजप प्रभारी निवड झाल्यावर क्लाईड क्रास्टो यांनी संधी सोडली नाही. गोवा बीचवर ‘आव गोयंचो सायबा’ म्हणत फडणवीस यांची रंगबिरंगी पोषाखातील पर्यटक म्हणून खिल्ली उडवली आहे. गोव्यात जाऊन आपली ‘मी पुन्हा येईन’ ही सुप्त इच्छा व्यक्त करत असल्याचा टोला या व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टो यांनी फडणविसांना लगावला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा फडणवीसांच्या खांद्यावर

येत्या 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबह, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाचरी राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा काल केली. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस हे भाजपचे आगामी गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहे. यासोबतच ] किशन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांची सह प्रभारी म्हणून निवड करण्यात आली.

Devendra Fadnavis Cartoons
केंद्राच्या अपेक्षा समजून घेवून गोवा निवडणुकीच्या कामाला लागेल: फडणवीस

फडणवीसांना गोव्यात विजयाचा विश्वास

या नियुक्तीनंतर देवेंद्र फडणविस यांनी भाडपाध्यक्षांचे आणि गोवा मंत्री मंडळाचे आभार मानले. "गोव्यातील जनता भारतीय जनता पक्षाला पुन्हा निवडून देणार अशी आशा आहे. गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्याच्या मंत्रिमंडळांनी गोव्यात चांगले काम केले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भाजपचं वेगळ स्थान निर्माण केलंय. तेव्हा मनोहर पर्रीकरांची कमतरता यावेळी जाणवत आहे. यापुढे पक्षासंबधी काही निर्णय केंद्राशी बोलून घेण्यात येईल. केंद्राच्या अपेक्षा समजून घेवून गोवा निवडणूकीच्या कामाला लागू," असे फडणविस म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com