नवनीत राणा यांनी सचिन, लता मंगेशकर आणि कोहली यांचे समर्थन करत विरोधकांना दिले प्रत्युत्तर  

दैनिक गोमन्तक
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

शेतकरी आंदोलनासंदर्भात देशातील दिग्गज सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली यांनी ट्विट केले होते. त्यांच्या या टविट् वरून बराच गोंधळ उडाला आहे. त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी याबाबत भाष्य करताना, राष्ट्रीय नायकांना देशासोबत किंवा देशाच्या विरोधात आहे हे सिद्ध करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई : शेतकरी आंदोलनासंदर्भात देशातील दिग्गज सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली यांनी ट्विट केले होते. त्यांच्या या टविट् वरून बराच गोंधळ उडाला आहे. त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी याबाबत भाष्य करताना, राष्ट्रीय नायकांना देशासोबत किंवा देशाच्या विरोधात आहे हे सिद्ध करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. भारत ही एक लोकशाही आहे, त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण आपले मत व्यक्त करू शकतो, असे नवनीत राणा म्हणाल्या. तसेच जर कोणी टवीट्च्या आधारावरून कोणाला जज करत असेल तर ते देखील देशविरोधी असल्याची पुस्ती  खासदार नवनीत राणा यांनी जोडली.  

राज्यसभेतील पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी उठविली टीकेची झोड 

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. मोदी सरकारच्या दबावाखाली येवुन दिग्गजांनी ट्वीट केले का नाही? याची चौकशी व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या याच मागणीनंतर महाराष्ट्र सरकारने ही कारवाई सुरू केली आहे. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची व्हर्चुअल भेट घेतली. रिहानाच्या ट्विटनंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रेटींच्या टविट मधील शब्द एकसारखे असल्याचे म्हणत ही मागणी करण्यात आली होती. रिहानाच्या ट्विटनंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली यांच्यासह मोठ्या तारकांनी  ट्विट केले आहे. यापैकी बर्‍याच जणांचे शब्द समान आहेत, असे कॉंग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे.

अमेरिकन पॉप सिंगर रिहाना आणि पर्यावरणीय कार्यकर्ती ग्रेटा थानबर्ग यांच्यासह काही परदेशी व्यक्तींनी भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना बद्दल ट्विटच्या माध्यमातून समर्थन केले होते. त्यानंतर सरकारच्या भूमिकेस समर्थन देत सचिन तेंडुलकर आणि अक्षय कुमार यांच्यासह विविध सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर 'इंडिया टुगेदर' आणि 'इंडिया अगेन्स्ट प्रोपेगंडा' हे हॅशटॅग पोस्ट केले होते.  

महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधला. ते म्हणाले की, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार या सर्वांनी बाहेरील लोकांच्या कटाच्या विरोधात ट्विट केले होते. अखंडभारत एकजूट आहे आणि आम्ही सर्व एकत्र आहोत, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकार एकजुटता सारख्या ट्विटला देशविरोधी कसे म्हणत असून, महाराष्ट्र सरकार लता दीदींच्या वयाचा विचार ना करता त्यांची चौकशी करणार असल्याने ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. 

संबंधित बातम्या