नवाब मालिकांनी भाजपची उडवली खिल्ली..

त्यांना काहीच साध्य करता येत नाही. भाजपाचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya)स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असले आरोप करतायेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक याचे मोठे विधान.
नवाब मालिकांनी भाजपची उडवली खिल्ली..
Nawab MalikDainik Gomantak

मुंबई: विरोधी पक्षावर केवळ आणि केवळ आरोप करत रहायचं ही भाजपची(BJP) जुनीच सवय आहे. याआधी ते म्हणायचे, भाजपाकडून बैलगाडी भरून पुरावे देणार. तसेच 24 हजार पानाच्या पुराव्याची देखील फाईल आमच्याकडे आहे. परंतु आता पर्यंत त्यांनी पुरावे सादर केले आहेत का? आणि जे आहेत ते पुरावे सगळे रद्दीत गेले आहेत. अश्या या भाजपाला सल्ला देत त्यांना सांगितले, जर रद्दी हवी असेल तर या कुर्ल्यामध्ये मी 10- 20 ट्रक भरून रद्दी देतो. अशा वाक्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मालिकांनी किरीट सोमय्याच्या आरोप करत थेट खिल्ली उडवली.

याबाबत बोलताना नवाब मलिक(Nawab Malik) म्हणाले, सद्या सोमय्या हे खोटे आरोप आणि खोटे बोलणे यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. ज्या बिनबुडाच्या आरोपात काहीही तथ्य नाही. केवळ आणि केवळ राजकीय कुरघोडीने आरोप करण्यात येत आहेत. फक्त केवळ राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत. आणि त्याबाबत कारवाई केल्या जातात. मात्र त्यातून त्यांना काहीही साध्य करता आले नाही. किरीट सोमय्या यांचे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असले बिनबुडाचे आरोप करत फिरत आहेत.

Nawab Malik
'लवकरात लवकर पीडीतेला न्याय मिळवून देऊ': मुंबई पोलिस आयुक्त

येणाऱ्या जिल्हा परिषद (ZP)निवडणुकांबाबत नवाब मलिक म्हणाले की,

सद्या सरसकट निवडणूका घेतल्या जाणार नाहीत. तर काही झेडपी निवडणूका रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. सुप्रीम कोर्टचा जो निवडणुकीबाबतचा जो निर्णय आहे तो जास्त दिवस थांबवता येणार नाही. या कोर्टाच्या निकालाचा फटका संपूर्ण राज्याला होऊ शकतो. त्यासंदर्भात कायदा करून आरक्षण टिकवण्याचा पर्याय आहे. आणि तो आता सर्व पक्षा पुढे आणला आहे. तो जर तो मान्य झाला तरच तो पर्याय निवडता येईल. अन्यथा दुसरा पर्याय आहे.

गोव्याच्या सत्तेत आम्ही काही दिवस होतो

गोव्या(Goa) राज्याच्या स्थापनेपासून आम्ही तिथे निवडणूका लढवत आलो आहे. गुजरात मध्येही आमचाच आमदार आहे. तसेच उत्तरप्रदेशमध्ये देखील आमचे आमदार होते. महाराष्ट्र सोडला तर देशात सर्व राज्यात निवडणुका आहेत. त्या सर्व ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने निवडणुका लढण्याचे अधिकार आम्ही दिले आहेत. भाजपाला सोडून कोणत्या पक्षांबरोरबर आघाडी करता येऊ शकते. याबाबतचे अधिकार आम्ही तेथील स्थानिक नेत्यांना दिली आहेत. आणि लवकरात लवकर तसे त्याचे प्रस्ताव केंद्रिय समितीकडे देण्याचे आदेश दिले आहेत. तेथील स्थानिक वातावरणानुसार त्या त्या ठिकाणी आघाडी करावी आणि त्याचा अधिकार त्यांना राहील. आम्ही राज्यात सर्वत्र निवडणूका लढवत आलो आहे. आणि असेच पुढे देखील लढवत राहू, असेही मलिक म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com