मुंबईच्या समुद्रात ड्रग्स पार्टीवर NCBची मोठी कारवाई; सुपरस्टारचा मुलगा गोत्यात?

एनसीबीने दहा जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश आहे.
मुंबईच्या समुद्रात ड्रग्स पार्टीवर NCBची मोठी कारवाई; सुपरस्टारचा मुलगा गोत्यात?
NCB big action on the drug party running on Cruise in mumbai@ANI

एनसीबीने (NSB) मुंबईहून (Mumbai) गोव्याला (Goa) जाणाऱ्या क्रूझ जहाजावर चालणाऱ्या ड्रग पार्टीवर छापा टाकला आहे. एनसीबीने दहा जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश आहे. क्रूझवर आठ तासांहून अधिक काळ हा छापा सुरू आहे. एनसीबीने अद्याप अधिकृतपणे लोकांची नावे जाहीर केलेली नाहीत. क्रूझवर पकडलेल्यांना उद्या सकाळपर्यंत मुंबईत आणले जाईल. यानंतर कायदेशीर कारवाई पुढे केली जाईल.

NCB big action on the drug party running on Cruise in mumbai
सकाळ महा कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींचा 'सहकार' प्लॅन

आठ तासांहून अधिक काळ छापेमारी सुरू

NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमने आठ तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरू ठेवली आहे. क्रूझवर जात असलेल्या पार्टीकडून एनसीबीला ड्रग्स मिळाले. ही क्रूझ मुंबईहून गोव्याला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही क्रूझ मुंबई सोडून समुद्रात पोहोचताच ड्रग्ज पार्टी सुरु झाली. क्रूझवर NCB ची टीम आधीच उपस्थित होती. मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडल्यानंतर क्रूझ मुंबईकडे वळवण्यात आली आहे.

छाप्यात सहभागी अधिकाऱ्यांचे फोन बंद केले

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, छाप्यात सहभागी असलेल्या सर्व एनसीबी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. त्यांना छापे संपेपर्यंत ते बंद ठेवण्यास सांगितले होते.

सुमारे 800 ते 1,000 प्रवासी असलेली ही क्रूझ 4 ऑक्टोबर रोजी मुंबईला परतणार होती. सूत्रांनी सांगितले की जहाजावर अनेक सेलिब्रिटीज होते. ताब्यात घेतलेल्यांना रविवारी मुंबईला परत आणले जाईल. NCB मागील वर्षापासून ड्रग्ज प्रकरणांवर सक्रियपणे काम करत आहे.

Related Stories

No stories found.