NCB म्हणजे फक्त 'फर्जीवाडा', नवाब मलिकांच टीकास्त्र
NCB raids are fraud says Nawab Malik Dainik Gomantak

NCB म्हणजे फक्त 'फर्जीवाडा', नवाब मलिकांच टीकास्त्र

खोट्या बातम्या पेरत NCB ने माझा जावाई ड्रग्स पेडरल असल्याचे सांगितले आणि हे सारे खोटे आहे- नवाब मलिक (Nawab Malik)

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा मोठा गोपयस्फोट केला आहे. नवाब मालिकांच्या जावायावर जो आरोप केला जात आहे त्यावरून त्यांनी मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे सांगत भाजपवर (BJP) पुन्हा जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांनी मला फोनवरून धमकी मिळत असल्याचा दावा देखील केला आहे. त्याच अनुषंगाने त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात अली आहे. (NCB raids are fraud says Nawab Malik)

या सगळ्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला खूप त्रास सहन करावा लागला असे सांगत यावेळी त्यांनी NCB वर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

माझ्या जावायावर बिनबुडाचे आरोप केले गेले, त्याचा काहीच संबंध नाही 12 जानेवारीला NCB कडून समीरला समन्स आला आला आणि दुसऱ्या दिवशी ते हजर होते. त्याच्यावर जो आरोप होता तो म्हणजे 200 किलो आम्ली पदार्थ सापडल्याचा हा आरोरोपच थोतांड खोटा आहे कारण तिथे फक्त साडेसात ग्रॅमच आम्ली पदार्थ सापडला होता आणि बाकी हर्षल तंबाखू होती मात्र खोट्या बातम्या पेरत NCB ने माझा जावाई ड्रग्स पेडरल असल्याचे सांगितले आणि हे सारे खोटे आहे. असे स्पष्टीकरण आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत दिले आहेत.

त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा NCB खोटी कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com