महाराष्ट्रात NCBची पुन्हा मोठी कारवाई! या जिल्ह्यातून 1.1 टन अंमली पदार्थाचा साठा जप्त

हे अंमली पदार्थ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मुंबईत येत होते.
महाराष्ट्रात NCBची पुन्हा मोठी कारवाई! या जिल्ह्यातून 1.1 टन अंमली पदार्थाचा साठा जप्त
NCB seizes one tonnes of narcotics in Maharashtra Dainik Gomantak

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई पथकाने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून 1.1 टन अंमली पदार्थाचा साठा पकडला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 4 कोटी आहे. हे अंमली पदार्थ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मुंबईत येत होते. पुरवठादार आणि प्राप्तकर्त्याची ओळख पटवली जात आहे. 2 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी आंध्र प्रदेशचे रहिवासी असून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मौजे मांजरमजवळ त्याची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले.

आणखी एका कारवाईत, एनसीबीने महाराष्ट्रातच जळगावमधून 1500 किलो अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. त्याची वाहतूक एका ट्रकमध्ये केली जात होती. जळगावच्या एरंडोलमध्ये हा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अंमली पदार्थ केवळ आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आणली जात नव्हती तर इतर राज्यांतही पाठवण्याची योजना होती.

NCB seizes one tonnes of narcotics in Maharashtra
महाराष्ट्रापेक्षा 'या' भागात पेट्रोल-डिझेल स्वस्त

नांदेडमध्ये अशी करण्यात आली कारवाई

नायगाव तालुक्यातील मौजे मांजरमजवळ (ब्लॉक) अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई एनसीबी पथकाला मिळाली होती. ही माहिती मिळताच मुंबई एनसीबीचे पथक पहाटे पाचच्या सुमारास मांजरमला पोहोचले. येथे स्थानिक पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने एमएच 26 एडी 2165 क्रमांकाचा ट्रक अडविण्यात आला. ट्रकची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान 35 पोत्यांमध्ये 4 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

NCB seizes one tonnes of narcotics in Maharashtra
क्रूरतेचा कळस...एका अल्पवयीन मुलीवर 400 नराधमांनी केला बलात्कार

जळगावात 1500 किलो गांजा पकडला

मुंबई एनसीबीने जळगाव जिल्ह्यातील एरडोल येथे सकाळी 1500 किलो अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. येथेही ट्रकमधून गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची टीप एनसीबीला मिळाली होती. एनसीबीने ट्रक थांबवून त्याची झडती घेतली असता सुमारे 1500 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. हा ट्रक आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून महाराष्ट्रात येत होता. नांदेडमध्ये जप्त केलेला गांजाही विशाखापट्टणम येथूनच आणला जात होता, हे या घटनेतील प्रमुख बाब आहे. सध्या याप्रकरणी एनसीबीकडून पुढील कारवाई सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com