दीपिका, श्रद्धा, सारा, राकुलला एनसीबीने बजावले समन्स

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

‘एनसीबी’च्या चौकशीत जया साहा हिची व्यवस्थापक करिश्‍मा हिचे आणि दीपिकाचे व्हॉट्‌सअप चॅट समोर आले आहेत.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने आज अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान यांना समन्स पाठवले आहे. ‘एनसीबी’च्या चौकशीत जया साहा हिची व्यवस्थापक करिश्‍मा हिचे आणि दीपिकाचे व्हॉट्‌सअप चॅट समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पदूोकोण गोव्यात आहे. दीपिकाच्या ज्या करिश्मासोबत ड्रगसंबंधी चॅट झालं होतं ती देखील काही कामानिमित्त गोव्यात आहे. याव्यतिरिक्त अभिनेत्री सारा अली खान देखील तिची आई अमृता सिंहसोबत गोव्यातील घरी आहे. रिया चक्रवर्तीने ड्रग प्रकरणात सारा अली खानचं नाव सगळ्यात आधी घेतलं असल्याचं म्हटलं जातं. 

एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्यांविरोधात आधी पुरावे गोळा केले गेले आहेत. अनेकजणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. रिया चक्रवर्तीचा जबाब देखील या प्रकरणात आधी नोंदवला गेला आहे. त्यानंतर यांच्याविरोधात पुरावे गोळा केले गेले आहेत. इतकंच नाही तर एनसीबीने या सेलिब्रिटींच्या विरोधात पुरावे गोळा करण्याआधी अनेक ड्रग पेडलर्सची चौकशी केल्याचं कळतंय. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या