शरद पवारांचा 'एकेरी' उल्लेख केल्याने चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या रडारावर

तेरी जुबान कतरना बहुत जरूरी है, तुझे मर्ज है की, तू बार-बार बोलता है! असं म्हणत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा टोला.
शरद पवारांचा 'एकेरी' उल्लेख केल्याने चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या रडारावर
NCP Dainik Gomantak

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी (NCP) आणि भाजप (BJP) या पक्षामध्ये चांगलीच टीका टिपणी होत आहे. अश्यातच भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) शरद पवार (Sharad Pawar ) यांच्याबद्दल व्यक्तव्य करताना सरळ सरळ त्यांचा एकेरीच उल्लेख केला. यावरून आता राज्यातील वातावरण आणखीच तापलेले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून टीका होत आहेत. शिवसेनेचे (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

NCP
Maharashtra: मनसेच्या नावाने खंडणी..

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चक्क शायरीतून चंद्रकांत पाटील यांच्यावरनिशाणा साधत ते म्हणाले, 'तेरी जुबान कतरना बहुत जरूरी है, तुझे मर्ज है की, तू बार-बार बोलता है!' असं म्हणत टोला लगावला. ते एवढ्यावर थांबले नाहीत, मिटकरी पुढे असंही म्हणाले की, 'शरद पवार जेव्हा देशाच्या संसदेत होते, तेव्हा हे चड्डी आणि टोपीत होते,' अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे काल एका कार्यक्रमाध्ये विधानसभेच्या (Assembly) समीकरणां संदर्भात बोलत असताना, शरद पवार यांचा उल्लेख एकेरी केला होता. ते असं म्हणाले, आपल्या या राज्यात शरद पवारचं आव्हान नाही, त्याला आम्ही 54 आमरांच्या वर जाऊ दिलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले असा आरोप होतोय.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com