Sharad Pawar: 'राज्यपालांनी हद्द केली...,' कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शरद पवारांचा पलटवार

Governor Bhagat Singh Koshyari: गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली.
Governor Bhagat Singh Koshyari & Sharad Pawar
Governor Bhagat Singh Koshyari & Sharad PawarDainik Gomantak

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे निर्माण झालेला वाद मिटताना दिसत नाही. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे पवार म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे म्हटले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. कोश्यारी यांची पदावरुन हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (Congress), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत.

Governor Bhagat Singh Koshyari & Sharad Pawar
Sharad Pawar: आजारी असतानाही पक्षाच्या बैठकीसाठी शरद पवार हेलिकॉप्टरने मुंबईतून शिर्डीत

सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काल त्यांनी शिवाजी महाराजांची स्तुती केली, पण त्यांना हे खूप उशिरा शहाणपण आलं. मला वाटतं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी योग्य तो निर्णय घ्यावा (कोश्यारीबद्दल). अशा लोकांना महत्त्वाची पदे देऊ नयेत.'

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार (Sharad Pawar) पुढे म्हणाले की, 'राज्यपाल पद हे एखाद्या संस्थेचे प्रतिनिधित्व करते आणि त्या पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही कोश्यारी यांच्या विरोधात कोणतेही भाष्य केले नाही.' या वक्तव्यावरुन राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

Governor Bhagat Singh Koshyari & Sharad Pawar
Maharashtra Politics:...म्हणून शरद पवार महाराष्ट्रातील 'भारत जोडो यात्रे'त होणार सहभागी

काँग्रेसने नवीन राज्यपाल नेमण्याची मागणी केली

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रासाठी नवा राज्यपाल नेमावा आणि भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या पदावरुन हटवावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. राज्यपालांनी असे वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे अशोभनीय असल्याचेही ते म्हणाले.

Governor Bhagat Singh Koshyari & Sharad Pawar
NCP अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला भेट देणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन

वादग्रस्त वक्तव्य पदावरुन हटवणार?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मला राजीनामा द्यायचा आहे, असे सांगितल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com