Osargaon Toll Issue: अन्यथा ओसरगाव टोलनाका सुरू होऊ देणार नाही, राष्ट्रवादी आक्रमक

ओसरगाव येथील टोल वसुलीला संपूर्ण जिल्हातील नागरिकांचा विरोध आहे.
Osargaon Toll Plaza
Osargaon Toll Plaza Dainik Gomantak

Osargaon Toll Issue: सिंधुदुर्ग जिल्ह्यातला (Sindhudurg) पहिला टोल नाका ओसरगाव (Osargaon) येथे जिल्ह्यातील सर्वांना कायमस्वरूपी टोलमाफी मिळाली पाहिजे, यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनांसाठी टोल माफी न दिल्यास टोल नाका सुरू होऊ देणार नाही अशी भुमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली आहे.

Osargaon Toll Plaza
Global Plastic Convention In Goa: गोव्यात जागतिक प्लास्टीक परिषदेचा शुभारंभ; 250 उद्योगसमूहांचा सहभाग

पुणे-नाशिक मार्गावर चाळकवाडी टोल नाका येथे त्या भागातील सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ओसरगाव येथील टोल नाक्यावर जिल्ह्यातील सर्व वाहनांना टोलमाफी मिळाली पाहिजे. टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावरून टोल नाका बंद करेल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अबीद नाईक यांनी दिला आहे.

Osargaon Toll Plaza
Iffi Goa: इफ्फीकडून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा गौरव; दाखवले जाणार तीन जुने चित्रपट

ओसरगाव येथील टोल वसुलीला संपूर्ण जिल्हातील नागरिकांचा विरोध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना या टोल नाक्यावर संपूर्ण टोलमाफी मिळाली पाहिजे. राष्ट्रवादीने कायमच जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळावी अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी कोणत्याही स्थितीत टोल वसुली करू देणार नाही. तसेच, टोल वसुली केल्यास टोल सुरू होऊ देणार नाही. असा इशारा अबीद नाईक यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com