पूजा चव्हण आत्महत्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी दिली प्रतिक्रिया

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

पूजाच्या आत्महत्येची चर्चा सुरु झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मुंबई: बीडमधील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेण्यात आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र शिवसेना या प्रकरणावरुन अद्याप तरी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. महाविकास आघाडीमधील इतर नेते भाजपच्या आरोपांना योग्य ती उत्तरे देत आहेत. मात्र हे प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आल्यापासून वनमंत्री गायब आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी  प्रतिक्रिया दिली आहे.

‘’चर्चा तर वेगवेगळ्या होत असतात. राज्यातील कोणत्याही  व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. त्य़ा मुलीला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करतो,’’ असं आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे नियम पाळावेच लागणार; अन्यथा कडक कारवाई होणार

पुण्यातील हडपसर भागातील महमंदवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पूजाच्या आत्महत्येची चर्चा सुरु झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून ते गायब झाले आहेत. तर राज्य़ाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.   

संबंधित बातम्या