NCP National Convention: विरोधी पक्षांच्या एकीचं नेतृत्व करणार शरद पवारांचा पक्ष

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak

NCP National Convention: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी होणार आहे. दिल्लीत होणारे हे अधिवेशन आगामी लोकसभा निवडणुकीभोवती केंद्रित होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात विरोधी एकजुटीची ब्लू प्रिंट काढली जाणार असल्याचे मानले जात आहे.

विरोधी पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी यापूर्वीच केले आहे. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी करून भाजपला चकित केले.

Sharad Pawar
मविआ सरकार बहुमत सिद्ध करेल - शरद पवार MVA Govt will Prove majority - Sharad Pawar | Gomantak Tv

उद्या होणार कार्यकारिणीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी सायंकाळी होत आहे. या बैठकीत विरोधी पक्षांची एकजूट, अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आदी प्रस्तावांवर चर्चा होऊ शकते. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, हे प्रस्ताव विरोधी ऐक्यासाठी ब्लू प्रिंट असू शकतात. पवार आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते रविवारी तालकटोरा स्टेडियमवर पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. या दरम्यान शरद पवार 2022 पर्यंत पीएम मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पुस्तिकाही जारी करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com