‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ फेम शहाजीबापूंना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठवली साडी

MLA Sahajibapu Patil
MLA Sahajibapu Patil Dainik Gomantak

महाराष्ट्रातील सत्ता नाट्य सर्व देशात गाजले, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) चांगलेच भाव खाऊन गेले. शहाजीबापूंचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हा डायलॉग सर्वदूर गाजला. याच शहाजीबापूंना आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) साडी पाठवली आहे. टिव्ही वरील एका कार्यक्रमात शहाजीबापूंनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना साडी पाठवली आहे.

MLA Sahajibapu Patil
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार सुहास कांदे आमनेसामने येण्याची शक्यता

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हा शहाजीबापूंचा डायलॉग महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वाजू लागला. बापूंची प्रसिद्धी मागील काही दिवसांत शिगेला पोहचली होती. याच धरतीवर त्यांना मराठीतील प्रसिद्ध कॉमेडी शो चाल हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) यामध्ये आमंत्रित केले होते. त्यावेळी बापूंनी आपल्या हटके गावराण अंदाजात मिश्किल टोलेबाजी केली. याचेवेळी त्यांनी आपल्या भूतकाळाच्या परिस्थितीचे देखील कथन केले.

शहाजीबापू पाटीलांनी पत्नीला साडीही घेता येत नाही असं विधान या शोमध्ये केलं होतं. पाटलाची बायको असून साडीही घेता येत नाही असे पाटील बोलले होते. नेमकं याच वक्तव्यावरून सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून शहाजीबापू पाटील यांना साडी पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शहाजीबापू यांच्या पत्नी रेखा शहाजीबापू पाटील यांच्या नावाने कुरियर केली आहे.

MLA Sahajibapu Patil
Maharashtra: बाळासाहेंबाच्या शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचं 'मिशन 188'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com