New Corona Guidelines: महाराष्ट्रात कोरोनाचे नवे निर्बंध लागू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

नियमांचे पालन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणे अपेक्षित आहे. ही नवी निय़मावली 31 मार्चपर्यंत राज्यात लागू करण्यात आली आहे. आणि या नियमांच पालन केल जाणं हे प्रत्येकाला अनिवार्य आहे. 

मुंबई: कोरोना विषाणूच्या संसर्गाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा  डोकं वर काढल्यामुळे आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी नवा इशारा दिल्यानुसार काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत, तर त्यापैकीच काही निर्बंध जास्त कठोर करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढचा प्रसार बघता राज्य शासनानं नव्याने नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे पालन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणे अपेक्षित आहे. ही नवी निय़मावली 31 मार्चपर्यंत राज्यात लागू करण्यात आली आहे. आणि या नियमांच पालन केल जाणं हे प्रत्येकाला अनिवार्य आहे. 

1. राज्यातील सर्व प्रकारची सिनेमागृहे उपहारगृहे हॉटेल 50 टक्के कार्यक्षमतेने सुरु राहतील. 

या सार्वजनिक ठिकाणी मास्क योग्य पद्धतीनं न वारपणाऱ्याना प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशाच्याच वेळी तापमानाची नोंद केली जाणं अनिवार्य आहे. योग्य त्या ठिकाणी सॅनिटायझरचा पुरेसा पुरवठा, मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन होणे गरजेचं आहे. त्यासाठी काही नविन माणसं नेमावीत. 

2. शहरांमधील विविध भागांमध्ये असणाऱ्या मॉलसाठी हेच नियम लागू असणार आहे.

अनेक माणसं एकाच ठिकाणी जमा होतील अशा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करणे टाळावे. या नियमाचं पालन न केल्यास प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याशिवाय ज्या ठीकाणी ज्या स्थळी या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. ती ठिकाणंही बंद करण्याची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात येईल.

3. लग्नकार्यांसमारंभासाठी 50हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती नसावी

4. अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांच्यावर उपस्थिती नसावी. स्थानिक प्रशासनानं या सगळ्या कार्य प्रसंगावर काटेकोर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 

5. धार्मिक स्थळी एक तासला किती लोकं उपस्थित राहू शकणार याचे नियोजन करावे, त्यानुसारच कोणत्याही धार्मिक स्थळी दर्शन घेता येणार आहे.

6. देव दर्शनासाठी ऑनलाईन विजिटचा पर्याय निवडावा आणि त्यालाच प्राधान्य देण्यात यावं. 

कार्यालयांसाठीचे नियम 

7. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के उपस्थितीच अपेक्षित असणार आहे.

8. खाजगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम करण्याला प्राधान्य द्यावं. कोरनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास कार्यालयावर बंदीची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

गृहविलगीकरणाचे नियम 

9. कोरोनाबाधिता रूग्णांबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात यावी. याशिवाय या माहितीमध्ये कोरोना बाधित व्यक्ती कोणत्या डॉक्टरांकडून विलगीकरणात राहून उपचार घेत आहे या गोष्टींचा देखील समावेश असावा. 

10. कोरोना बाधित व्यक्ती विलगिकरणात असतांना ज्या ठिकाणी तो राहतोय त्या ठिकाणी एक फलक 14 दिवसांसाठी ठेवण्यात यावा आणि त्यामध्ये इथे कोरोनानाबाधित रुग्ण असल्याची सुचना नमूद असावी. 

11.गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांवर कोरोना संबंधीचा शिक्का असावा

विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तीच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींनीही त्यांची बाहेर येणे जाणे टाळावे आणि नियंत्रणात ठेवावे. आणि मास्करचा वापर आवर्जून करावा. त्याचबरोबर शासनाने लागू केलेल्या त्रिसुत्री नियमांचे पालन करावे.

कोरोना: महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक! इतर 10 राज्यांतही संसर्गात वाढ 

वरीलपैकी कोणत्याही नियमाचं उल्लंघन नागरिकांकडून किंवा रूग्णांकडून झाल्यास त्याला तातडीनं स्थानिक प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येईल.  

संबंधित बातम्या