सार्वजनिक-खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

राज्यात नवीन मेडीकल कॉलेज (Medical Colleges) आणि अतिविशेष उपचार रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सार्वजनिक-खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्य सरकारने  घेतला हा मोठा निर्णय
New Medical Colleges & extraordinary treatment hospital will be start in MaharashtraDainik Gomantak

राज्यात नवीन मेडीकल कॉलेज (Medical Colleges) आणि अतिविशेष उपचार रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र्रात MD, MS, DNB जागा तीन वर्षात 1000 ने वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगण्यात आले आहे यापैकी एकूण 350 जागा नव्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असतील. तसेच सार्वजनिक- खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. (New Medical Collages & extraordinary treatment hospital will be start in Maharashtra)

सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये उभारून राज्यातील आरोग्य सुविधा वाढ व्हावी आणि ती अधिक आधुनिक व्हावी यासाठी म्हणून हा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. काल पार पडलेल्या वैद्यकीय विभागाच्या या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

महाराष्टामध्ये सध्या सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका तसेच नगरपालिकांतर्फे नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात . पण खरे पाहता राज्यातील बराचसा भाग ग्रामीण असल्यामुळे त्याबरोबर जी शहरे छोटी आहेत अशा शहरांमध्ये नागरिकांना दर्जेदार व परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवत आहे. आजरोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेचे जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाचे रूग्णालय अस्तित्वात आहेत आणि याच रुग्णालयांच्या मार्फत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात यात अधिक वाढ व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

New Medical Colleges & extraordinary treatment hospital will be start in Maharashtra
धोका वाढला! महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com