नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्तांची स्मार्ट पत्रकार परिषद; वाचा ते काय म्हणाले

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

सचिन वाझे प्रकरण तापलेले असताना आज या प्रकरणाशी संबंधित मोठ्या हालचाली महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या. यात मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. हेमंत नागराळे यांनी तातडीने आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आणि पदावर रुजू होताच पत्रकार परिषद घेतली.

सचिन वाझे प्रकरण तापलेले असताना आज या प्रकरणाशी संबंधित मोठ्या हालचाली महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या. यात मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. हेमंत नागराळे यांनी तातडीने आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आणि पदावर रुजू होताच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सचिन वाझे प्रकरणाशी संबंधित विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी तपास सुरु असणाऱ्या कुठल्याही प्रकरणावर बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. 

सचिन वाझे प्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी 

मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहे मात्र सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडे हा कार्यभार राज्य शासनाने सोपवला असल्याचे नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. तसेच मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले. व यासह महाराष्ट्र पोलिसांवर आगामी काळात कोणीही टीका करू शकणार नसल्याची पुस्ती त्यांनी जोडली. व सक्षम पोलीस दल म्हणून आम्ही कार्य करू अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. यानंतर सचिन वाझे प्रकरणावर बोलताना, वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये  कोणत्याही पोलिसांचा असलेला समावेश हा अयोग्यच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय केंद्रीय तपास यंत्रणा या सचिन वाझे प्रकरणावर तपास करत असून, लवकरच सगळे सत्य समोर येईल आणि त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे हेमंत नगराळे म्हणाले. याव्यतिरिक्त, तपास यंत्रणा चौकशी करत असलेल्या एखाद्या प्रकरणावर सध्या आपण बोलणे उचित ठरणार नसल्याचे हेमंत नगराळे यांनी पुढे सांगितले.  

दरम्यान, राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्तांसह काही अधिकाऱ्यांच्या पदभरात केलेल्या बदलाच्या निर्णयानंतर लगेचच राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे, परमवीर सिंग आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले. सचिन वाझेंची पार्श्वभूमी, वेगवेगळ्या प्रकरणाशी त्यांचा असलेला संबंध हे मुद्देदे उपस्थित करत पोलिसच जर अशा पद्धतीने काम करणार असतील तर राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेला कोण संभाळणार असल्याचा गंभीर प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

संबंधित बातम्या