सचिन वाझे प्रकरणात एनआयएला मिळाले महत्वाचे धागेदोरे  

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी दिवसेंदिवस गुंतागुंतीची बनत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी दिवसेंदिवस गुंतागुंतीची बनत चालल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय या प्रकरणात मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचेही नाव संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणाची चौकशी करत असून, एनआयएला अटक केलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी वापरलेली मर्सिडीज कार मिळाली आहे. एनआयएने केलेल्या तपासात सचिन वाझे ही कार वापरत असल्याचे समोर आले आहे. तसेच ही गाडी धुळे येथे राहणाऱ्या भावसार या व्यक्तीची होती. आणि त्याने नवीन वर्षाच्या सुरवातीलाच ही कार ऑनलाईन माध्यमातून विकली असल्याची माहिती समजली आहे. 

भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाबाबत रेल्वे मंत्र्यांचं मोठं विधान

याशिवाय, एनआयएने ही कार मंगळवारी रात्री जप्त केली असून, या प्रकरणाशी संबंधित बर्‍याच गोष्टी देखील या कार मधून मिळाली असल्याचे समजते. या गाडीत एक चेक्स शर्ट देखील मिळाला आहे. आणि हा शर्ट मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार लावलेल्या पीपीई किट परिधान केलेल्या व्यक्तीने घातल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याशिवाय कारमधून पाच लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. इतकेच नाही तर, स्कॉर्पिओ कारची नंबर प्लेटही या गाडीत सापडली आहे. तसेच एक नोटा मोजण्याचे मशीन देखील या गाडीत मिळाले आहे. आणि कारमधून प्लास्टिकच्या बाटलीत केरोसीन देखील मिळाले आहे. ज्यावरून पीपीई किटची विल्हेवाट लावल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

यानंतर, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) च्या तपासात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझे डोक्यावर मोठा रुमाल बांधताना दिसत आहेत. व सचिन वाझे यांनी आपली बॉडी लॅंग्वेज लपविण्यासाठी एक मोठा कुर्ता-पायजामा परिधान केल्याचे समोर येत आहे. मात्र त्यांनी घातलेला हा ड्रेस पीपीई किट नसल्याची माहिती या व्हिडिओ मधून मिळत आहे. 

दरम्यान, गेल्या महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एक स्फोटकांनी भरलेली संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. आणि या घटनेच्या एका आठवड्यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे मागील चार महिन्यांपासून ही गाडी चालवत होते. व मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ही कार आढळून आल्यानंतर देखील सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे मिळाली होती.     

संबंधित बातम्या