एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर NIA चा छापा

एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर NIA चा छापा
Pradeep Sharma

मुंबई: अँटिलिया प्रकरणात नवीन खुलासे केले जात आहेत. आज एनआयएने(NIA) मुंबईचे एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा(Pradeep Sharma) यांच्या घरी छापा टाकला आहे. आणि अद्याप चोकशी सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील(Mumbai) अंधेरी येथील जीबी नगर भागात भगवानदास बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरील प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी एनआयएची टीम प्रदीप शर्मा यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करीत आहे.(NIA raids Encounter Specialist Pradeep Sharma house)

प्रदीप शर्मा आणि सचिन वाजे यांची जवळीक कोणालाही लपून राहिलेली नाही. प्रदीप शर्मावर अनेक आरोप आहेत. अँटिलीया प्रकरणात प्रदीप शर्माविरूद्ध तपास एजन्सीकडे अनेक पुरावे सापडले, नुकतेच संतोष सेलर आणि आनंद जाधव यांना अटक करण्यात आली. दरम्यान प्रदीप शर्माची संतोष सेलरशी गाढ मैत्री होती असे सांगितले जात आहे.  

या कारवाईला सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत. सीआरपीएफचे 8 ते 10 ताफे प्रदीप शर्मा यांच्या घराजवळ तैनात करण्यात आले आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या निशान्यावर आहेत. 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा याच्या घरी NIA ची ही कारवाई तब्बल 4 तासापासून सुरू आहे. या प्रकरणात याआधी शर्मा यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी शर्मा यांचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आले होता असे सूत्रांनी सांगितले होते. नुकतेच एनआयएने  संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली आहे.संतोष शेलार हा शर्मांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. काल बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोन जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाजे यांची अंधेरीत मिटिंग झाल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com