सचिन वाझेप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई 

सचिन वाझेप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई 
sachin waze.jpg

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. एनआयए अहमदाबाद येथील कोळसा व्यापऱ्यास ताब्यात घेतले आहे. किशोर ठक्कर असे या कोळसा व्यापाऱ्याचे नाव आहे. मनसुख  हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून एनआयएने अटक केलेल्या नरेश गोरे यांना ठक्कर यांनी सिमकार्ड पुरवले. त्यानंतर गोरे यांनी ते सिमकार्ड कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि माजी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना दिले, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. 

यावेळी गुंड लखन भैय्या यांच्या एन्काऊंटर प्रकरणात विनायक शिंदे पॅरोलवर आले होते. एनआयएने निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना या प्रकरणातील मुख्य आरोपी मानले आहे. यापूर्वी एनआयएने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयास्पद कार प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. पण आता ते मनसुख हिरेनच्या हत्येच्या प्रकरणातही चौकशी करत आहेत. 13 मार्च रोजी एनआयएने संशयास्पद कारच्या संदर्भात मुंबई पोलिस निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. आता एनआयए मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांच्याकडे ते मास्टरमाइंड म्हणून पाहात आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने 21 मार्चला विनायक शिंदे आणि नरेश गोरे या दोन हवालदारांना अटक केली. सचिन वाझे यांना सिमकार्ड पुरविल्याचा आरोप गोरे यांच्यावर आहे, तर विनायक शिंदे यांच्यावर वाझे यांच्या सांगण्यावरून मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप आहे. विनायक शिंदे आणि नरेश गोरे यांच्यानंतर गेल्या आठवड्यात एटीएसने कोळसा व्यापारी किशोर ठक्कर यांना अटक केली. 

मैत्रीतून नरेश गोरे यांना सिमकार्ड दिल्याची ठक्कर यांची कबुली 
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवालदार नरेश गोरे यांना मैत्रीच्या नात्यातून सिमकार्ड पुरवले असल्याची कबुली किशोर ठक्कर यांनी कबूल केले आहे. पण त्या सिमकार्डचा वापर गंभीर गुन्ह्यात केल्याची कोनीतीही माहिती त्यांना नव्हती, असेही त्यांनी कबूल केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात  किशोर ठक्कर यांना साक्षीदार बनविण्यात आले असून आता एनआयएने त्यांना चौकशीसाथी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com