कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे पुण्यात नाईट कर्फ्यू लागू; 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. उद्यापासून नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. उद्यापासून नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. शनिवारी पुण्यात 849 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने रात्री 11 ते सकाळी 6 या दरम्यान रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी आज सांगितले की, रात्री अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर कोणलाही प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.  शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयेही 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू ? पुढच्या आठवड्यात निर्णयाची शक्यता

पुण्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या 3,97,431 वर पोहोचली आहे. सक्रीय प्रकरणांची संख्या 2,561 आहे, त्यापैकी 160 रूग्ण गंभीर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात 6,000 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, याकरिता काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेण्यासाठी आज पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पुण्यात बैठक घेतली. या बैठीकीत नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला.

सातारा, अमरावती जिल्ह्यासंह तीन जिल्ह्यात कोरोनाचा विदेशी स्ट्रेन ?

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विदर्भाची चिंता पुन्ही एका वाढली आहे. आमरावीत शनिवारी रात्री 8 पासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यवतमाळमध्ये देखील काही निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा व महाविद्यालयेदेखील 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.लग्न समारंभ, चित्रपटगृहांवर 50 लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन झाल्यास, कडक कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या