नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रातसंचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.

मुंबई :  ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात पुन्हा भीती पसरली असून, खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्बंध घालण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये नवा करोना विषाणू हा अधिक वोगाने पसरतो. त्यामुळे आणखी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जाणार आहे. युरोपीय देशांसह आखाती देशांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे.  क्वारंटाइन केल्यानंतर काही दिवसांनी त्यांची करोनाची चाचणी केली जाईल. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी  राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार आहे.

 
 

संबंधित बातम्या