''आज गेलात तर उद्या संपून जाल''

बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आवाहन
''आज गेलात तर उद्या संपून जाल''
Nitin DeshmukhDainik Gomantak

राज्यात सत्तेचे फासे आता भाजपच्या बाजुने सरकत असल्याचं चित्र आहे. कारण शिवसेनेचे अनेक नेते दबक्या आवाजात हा सुर आळवताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील अस्थिरतेबद्दल ट्विट केले आहे. असे असले तरी अगोदर बंडखोर आमदारांसोबत गेलेले आणि गुवाहाटी येथून परतलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी आज गेले आहात पण उद्या संपून जाल असा इशारा दिला बंडखोरीच्या भुमिकेत असलेल्या नेत्यांना दिला आहे. (Nitin Deshmukh urges revolted shiv sena mla to return shivsena )

Nitin Deshmukh
'मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे...': मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

देशमुख यांनी यावेळी बोलताना बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. या सर्व घडामोडींच्या मागे एकनाथ शिंदे यांचे नाव असले तरी यामागे भाजपा आहे. नितीन देशमुख म्हणून मला लोकांनी मत दिले नाही. माझ्या पदाधिकऱ्यांनी माझ्या विजयासाठी जीवाचं रान केलं. माझी सर्वांना एक विनंती आहे. तुम्ही शिवसेनेच्या आधारे आमदार झाले आहात. तुम्ही स्वबळावर आमदार झालेला नाही आहात. आपल्या मागे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता हे विसरु नका असे ही ते यावेळी म्हणाले.

शिवसैनिकांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं. ज्या मतदारांनी तुम्हाला शिवसैनिक म्हणून निवडून दिलं त्यांचा आदर करा. या सर्व गोष्टीचां विचार करुन परत या. आज तुम्ही गेलात उद्या संपून जाल,” असे देशमुख म्हणाले. तसेच, “शिंदे यांच्यासोबत आमदार जातील, शिवसैनिक जाणार नाहीत. मतदार ही जाणार नाहीत. आमदार गेला म्हणून पक्ष संपत नसतो. पक्ष हा पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. माझी शिंदे यांना देखील परत येण्याची विनंती आहे,” असेही देशमुख म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com