मोदींच्या विरोधात विरोधकांकडे सक्षम चेहरा नसल्याच्या चर्चेला पवारांकडून पूर्णविराम

काही ठराविक अधिकाऱ्यांना (officers) घेऊन काही ठराविक व्यक्ती किंवा विचारधारेंच्या लोकांनाच कसा त्रास देता येईल हे सध्याच्या राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन आहे
मोदींच्या विरोधात विरोधकांकडे सक्षम चेहरा नसल्याच्या चर्चेला पवारांकडून पूर्णविराम
Sharad PawarDainik Gomantak

नाशिक: विरोधकांकडे मोदी विरोधात सक्षम चेहरा नाही असे म्हणणे चुकीचे आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आणीबाणीचा दाखला दिला आहे. सद्या शरद पवार दोन दिवशीय नाशिक दौऱ्यावर आहेत. निफाड मध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, मोदी (Modi) विरोधात विरोधकांकडे सक्षम असा चेहरा नाहीच? या प्रश्नावर पवार म्हणाले, इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) आणीबाणी लावली होती, त्यावेळी त्यांच्या विरोधात नेतृत्व नव्ते. परंतु त्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभे राहिले. यामुळे विरोधकांकडे चेहरा नाही असे म्हणता येणार नाही. असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
शरद पवार आणि सहकार मंत्र्यांच्या भेटीचा 'गोड उद्देश'

तसेच, इडीच्या (ED) कारवाई संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, काही ठराविक अधिकाऱ्यांना घेऊन काही ठराविक व्यक्ती किंवा विचारधारेंच्या लोकांनाच कसा त्रास देता येईल हे सध्याच्या राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन दिसून येत आहे.

धाडी टाकणे, चौकशा करणे हा आता रोजचाच एक भाग झाला आहे. यासाठी अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे. विशिष्ट अधिकाऱ्यांची (officers) विशिष्ट ठिकाणी नियुक्ती केली जातेय. तसेच त्यांना मुदतवाढ दिली जातेय. आम्ही आता त्याबाबतची चिंता सोडून दिली आहे. सुरुवातीला काही दिवस आम्ही अस्वस्थ होत होतो. परंतु आता या सगळ्याला सामोरे जायची मानसिकता तयार झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com