आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत मागच्या 24 तासांत एकही रुग्ण नाही

dharavi.jpg
dharavi.jpg

मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्ण (Covid19) आढळण्याची प्रमाण झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच मुंबईच्या (Mumbai) धारावीमधील (Dharavi) परिस्थितिकडे तर आदर्श  म्हणून पाहिलॆ 24  तासांत एक सुद्धा नवा रुग्ण (New Cases) सापडला नसल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच धारावीत एकही रुग्ण आढळला नसल्याने कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये ही गोष्ट अत्यंत साकारात्मक आहे. यापूर्वी मागच्या  प्रकारे 25 डिसेम्बर रोजी धारावीत एकही रुग्ण सापडला नसल्याचे समोर आले होते. (No News Covid-19 patients were found in the dharavi slum)

तसेच इतर भागात देखील रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसते आहे.  दादरमध्ये देखील 24 तासांत फक्त तीन रुग्ण आढळून आले आहे. तर अशाच प्रकारे माहीममध्ये मागच्या 24 तासांत फक्त 6 नवे रूगन अढळुन आले आहे. याचवेळी देशात देखील कोरोना रुग्ण आढळण्याची प्रमाण कमी होताना दिसते आहे. मागच्या 24 तासांत देशात 70421 नवे रुग्ण सापडले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत या बाबी अत्यंत साकारात्म असल्याचे समजते आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले असून, मागच्या 24 तासात देशात 3921 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीतील नागरिकांच्या सहकार्याने आणि आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि पालिका कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानानेच  खऱ्या अर्थाने बऱ्याच अंशी हा लढा यशस्वी ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com